अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८९० इतकी झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज २६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४०२५ इतकी झाली.
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, संगमनेर ०२, पाथर्डी ०१,
नगर ग्रामीण ०३, कॅन्टोन्मेंट ०३, पारनेर ०३, शेवगाव ०१, कोपरगाव ०१ आणि जामखेड येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील ३९ रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत बाधित आढळून आले.
दरम्यान, आज एकूण २६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा ११३,संगमनेर ५५, राहाता १०, पाथर्डी १८,नगर ग्रा.३,श्रीरामपूर ८, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा ४, श्रीगोंदा ५, अकोले १८, राहुरी २, कोपरगाव ७, जामखेड १, कर्जत ११,इतर जिल्हा ५
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com