अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या @ ६३९१९ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ९१९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३२ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३३८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७८, आणि अँटीजेन चाचणीत ८० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १९, नेवासा ०९, पारनेर ०८, पाथर्डी ०३, राहाता ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०२, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, अकोले ०३, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०४, पारनेर ०५, राहाता ०४, राहुरी ०७, संगमनेर १७, श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ८० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०२, अकोले ०२, जामखेड ०२, कर्जत ०७, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०४, पारनेर ०७, पाथर्डी ०४,

राहाता ०९, राहुरी ०१, संगमनेर १६, शेवगाव १४, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५५, अकोले १८, जामखेड ०२, कर्जत ०५,

कोपरगाव १७, नगर ग्रामीण १६, नेवासा १२, पारनेर १७, पाथर्डी २२, राहाता ४३, राहुरी ०६, संगमनेर ५२, शेवगाव ११, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:६३९१९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १३३८
  • मृत्यू:९७६
  • एकूण रूग्ण संख्या:६६२३३
  • अहमदनगर Live24
    च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24