अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात २० कोरोना बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आढळलेल्या ८ रुग्णांची नोंद एकूण संख्येत घेण्यात आली.
खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ८ रुग्णामध्ये राहाता, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर मधील प्रत्येकी एक आणि अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ५ रुग्णांचा समावेश आहे.
आयसीएमआर पोर्टलवर या रुग्णांची नोंद झाल्यानंतर त्यांचा एकूण रुग्ण संख्येत समावेश करण्यात आला.
आज जिल्ह्यात १८ रुग्णांना तर पुणे येथे उपचार घेत असलेला एक रुग्ण असे १९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews