अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 347 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
नगर शहरात सर्वाधिक 453 रुग्ण आढळले. त्या खालाेखाल राहाता आणि काेपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या आहे. ती अनुक्रमे 116 आणि 102 एवढी आहे.
नगर शहरात वाढती रुग्णसंख्या पाहून आयुक्त शंकर गाेरे यांनी शहरातील सर्व काेविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. अहमदनगर शहर 453, राहाता 116, संगमनेर 90,
श्रीरामपूर 75, नेवासे 18, नगर तालुका 68, पाथर्डी 92, अकाेले 21, काेपरगाव 102, कर्जत 07, पारनेर 26, राहुरी 49, भिंगार शहर 26,
शेवगाव 66, जामखेड 60, श्रीगाेंदे 60, मिलिटरी रुग्णालय 03 आणि इतर जिल्ह्यातील 16 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
लष्करी तळालगत असलेल्या भिंगार शहरात 26 जणांना काेराेना ससंर्गाचे निदान झाले. याचबराेबर लष्करी रुग्णालयात देखील तीन जणांना संसर्गाचे निदान झाले.
जिल्हा रुग्णालयानुसार 753, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 454 आणि रॅपिड चाचणीमध्ये 148 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.