अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘एवढे’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ८१ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३१६ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५५७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११० आणि अँटीजेन चाचणीत १०९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले ०२, जामखेड ०४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०६, पारनेर ०२, पाथर्डी १०, राहुरी ०२,

संगमनेर ०५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, कॅन्टोन्मेंट ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९, अकोले ०२,

कर्जत ०२, कोपर गाव ०२, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०४, पारनेर ०७, पाथर्डी ०२, राहाता ११, राहुरी ०६, संगमनेर १७, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १०९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १०, अकोले ०५, कर्जत ०५, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०५, पारनेर ०५, पाथर्डी १४, राहाता १२, राहुरी ०२,

संगमनेर २१, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ९८, अकोले १६, जामखेड ०५,

कर्जत १३, कोपरगाव १४, नगर ग्रामीण १७, नेवासा २१, पारनेर २०, पाथर्डी १६, राहाता १७, राहुरी १३, संगमनेर ६०, शेवगाव १६, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:६३०८१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १५५७
  • मृत्यू:९७१
  • एकूण रूग्ण संख्या:६५६०९

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

अहमदनगर लाईव्ह 24