अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स 5 मे 2020 : ‘त्या’ तिघांना मिळाला डिस्चार्ज !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-   कोरोना बाधित असलेल्या नेवासा येथील एक आणि जामखेड येथील दोघा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 28 झाली आहे. एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14 रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

नेवासा येथील व्यक्ती कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र 14 दिवसानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव आल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते.

त्यानंतर सात दिवसांनी त्याचे अहवाल घेण्यात आले हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तसेच जामखेड येथील दोन्ही व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला.

हे दोन्ही रुग्ण जामखेड येथील कोरोना बाधित मृत व्यक्तीचे मुलगे आहेत. त्यांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

मात्र जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44 असून त्यापैकी आता 28 रुग्ण कोरोना मुक्त होऊन परतले आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित तेवीस व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत आणखी 18 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६४४ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५५५ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24