अहमदनगर Live24 टीम (13 जुलै 2020 8.45 PM) : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले
तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६३ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ७२ रुग्णांची भर पडली.
जिल्हा रुग्णालयात अहवालानुसार, कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील ३ तर श्रीगोंदा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर ११ (घुलेवाडी २, मालदाड रोड ०३, भारत नगर ०१, जनता नगर ०१, निमोण ०२, जोर्वे रोड रहमद नगर ०१, अरगडे गल्ली ०१)
नगर मनपा १७ (विनायक नगर ०४, शाहुनगर केडगाव ०१, श्रीराम नगर ०१, सुभेदार गल्ली ०१, भवानीनगर ०१, सावेडी ०३, कावरे मळा ०१, नगर शहर ०५)
दरम्यान, आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ७२ रुग्णांची नोंद झाली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews