अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ५६२ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०५१ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३५ आणि अँटीजेन चाचणीत ६० रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, अकोले ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०२, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहता ०४, राहुरी ०१, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, अकोले ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०१, पाथर्डी ०१, राहाता ०५, संगमनेर ०५, श्रीरामपूर ०२, इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ६० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०५, जामखेड ०३, कोपरगाव ०६, नेवासा ०५, राहाता ०५, राहुरी ०१, संगमनेर २४, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०४,
कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, अकोले ११, कर्जत ०१, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०९,
नेवासा १५, पारनेर १४, पाथर्डी ०४, राहाता १६, राहुरी ०३, संगमनेर ४७, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि जिल्ह्याबाहेरील ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.