अहमदनगर हादरले ! अनैतिक संबंध बघितल्याने आईने केली मुलाची हत्या …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- आई’ म्हणजे देवाचं दुसरे रूप. असे म्हणतात की देव स्वत: या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते. जे आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकते आईची सर कोणीच करू शकत नाही. “स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी” असे म्हटले जाते. 

आईची माया अगाध आहे. परंतु नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्‍यात चक्क आईनेच आपल्या काळाजाच्या तुकड्याची दगडाने ठेसून हत्या केल्याची अत्यंत भयानक घटना समोर आली आहे. 8 वर्षीय मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आले. वरखेड येथे ही घटना घडली.

अनैतिक संबंध बघितल्याने हत्या !

पोलिसांनी केलेल्या तपासात आठ वर्षीय मुलाची हत्या ही अनैतिक संबंध बघितल्यानेच झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाची आई आणि प्रियकरानं हत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात घडलीय..

छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला होता मृतदेह 

नेवासा तालुक्यातील वरखेड येथील पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत एका मुलाचा मृतदेह परिसरातील दत्तात्रय जगनाथ गोरे यांच्या शेताजवळील पाटाजवळ  प्रथम आढळून आला होता.

 मयत मुलगा बुलढाणा जिल्ह्यातील 

या घटनेची माहिती समजताच नेवासे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत मुलाचे नाव सोहम उत्तम खिलारे उर्फ बारकू (वय ८) असे आहे. सोहम हा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेहेरबाद येथील आहे. 

दुसऱ्या नवऱ्याबरोबर रहायची मुलाची आई… 

सध्या नेवासा तालुक्यातील वरखेड देवी येथे मंदिरासमोरील एका घरात तो आपली आई सीमा उत्तम खिलारे (वय २७) हिच्याकडे राहत असे. सोहम याची आई ही आपल्या प्रियकर असलेल्या दुसऱ्या नवऱ्याबरोबर गेली चार ते पाच वर्षांपासून राहत होते. 

अनैतिक संबंध बघितल्याने हत्या !

दरम्यान पोलीस तपासात आठ वर्षीय मुलाची हत्या ही अनैतिक संबंध बघितल्यानेच झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मुलाच्या आईसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलीस पाटील संतोष घुंगासे यांनी फिर्याद दिली.

तो नेहमीच भीतीच्या सावटात वावरत…

मयत सोहमची आई व सावत्र वडील समाधान यांच्याकडून नेहमीच छळ होत असल्याची चर्चा वरखेड गावात ऐकायला मिळत आहे. दहा वर्षीय बालक हा आपली पोटाची भूक भागविण्यासाठी वेळप्रसंगी गावात भाकरी मागत होता. अशीच माहिती समोर आली आहे. तो नेहमी भीतीच्या सावटात वावरत असल्याचेही ग्रामस्थ म्हणतात.

अहमदनगर लाईव्ह 24