अहमदनगर :- पतीला जेलमधून सोडवण्यासाठी त्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना १७ एप्रिलला केडगावातील दत्त चौकात घडली होती. याप्रकरणी कोर्टाच्या अादेशानंतर शुक्रवारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लवसिंग कतरसिंग चावला (रा. पोलिस कॉलनी, सावेडी) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत महिलेच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
पती सध्या जेलमध्ये असून त्याला बाहेर काढायचे असेल तुला माझ्याशी शरीर संबंध ठेृवावे लागतील, असे म्हणत आरोपीने पिडीत महिलेशी गैरवर्तन केले.
झाला प्रकार पतीला सांगितल्यानंतर त्याने आरोपी विरूध्द कोर्टात अर्ज दाखल केला. कोर्टाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.