अहमदनगर जिल्ह्यातील नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! धक्कादायक माहिती समोर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहमदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेवासा तालुक्यामध्ये नुकतीच अशी एक घटना घडली.

या घटनेतील नववधूला पळून जाताना पकडण्यात पोलिसांना यश आले व तिने सर्व हकीगत सांगितल्यानंतर लाखो रुपये घेऊन लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीचे रॅकेट उघडकीस आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि नेवासा तालुक्यातील एका तरुणाचे बऱ्याच दिवसांपासून लग्न जमत नव्हते.

अखेर त्याला शारदा तनपुरे हिच्याकडे लग्नाकरिता मुलगी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित तरुण हा आपल्या नातेवाईकांसह मुलगी पाहण्यासाठी गेला. मुलगी पसंत झाल्यानंतर लग्न करायचे ठरले व मुलीच्या घरच्यांना लग्नासाठी दोन लाख रुपये हुंडा दिल्यानंतर संबंधित तरुणाचे ३ नोव्हेंबरला लग्न झाले.

६ नोव्हेंबरला पत्नीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला संबंधित तरुण नेवासा येथे घेऊन आला, मात्र ती नेवासा येथून गुपचूप पळून गेली. पत्नीचा शोध घेत असतानाच संबंधित तरुणाला ती पोलीस ठाण्यात सापडली. यावेळी तिच्याकडे चौकशी केली असता तिने हे लग्न तिच्या साथीदारांच्या सांगण्यावरून केले असल्याचे उघड झाले.

त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिचे खरे नाव रुपाली पांडुरंग जगताप असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी याप्रकरणी शारदा भागाजी तनपुरे ( रा. टिटवी, ता.लोणार, जि.बुलडाणा), सागरबाई किसन डवरे (रा. लोणार, जि. बुलडाणा),

मायावती नारायण चपाते (रा. जमुनानगर, जि. जालना), अनिल नाथा झिने (रा. जमुनानगर, जि. जालना) व रुपाली पांडुरंग जगताप यांना अटक केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24