अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : जूनच्या पहिल्याच आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी असून पेरणीच्या कामास सुरवात झाली आहे. अद्द्याप राज्यात मान्सून दाखल झाला नाही. मात्र जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच वार्षिक सरासरीच्या १८ टक्के पाऊस झाला आहे.
मागील वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या ५ टक्के पावसाची नोंद झाली होती. या वर्षी मे मध्ये फारसा पाऊस झाला नाही. मागील वर्षी जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती.
यंदाही जून महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांमध्येच जिल्ह्यात सरासरी ९४ मिलिमीटर म्हणजेच जवळपास १८ टक्के पावसाची नोंद झाली. नगर जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या काळात सरासरी ५१५ मिलिमीटर पावसाची नोंद होत असते.
मागील वर्षी जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये केवळ २६ मिलिमीटर म्हणजे अवघ्या ५ टक्के पावसाची नोंद झाली होती. परंतु यंदा मात्र जूनच्या पहिल्याच आठवड्यात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १३ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
जूनच्या पहिल्याच आठवड्यात समानधनकारक पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. यंदा जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये अकोले तालुक्यात १३४ मिलिमीटर, संगमनेर ८३ मिलिमीटर, कोपरगाव १२६ मिलिमीटर, श्रीरामपूर १५० मिलिमीटर, राहुरी १४३ मिलिमीटर,
नेवासा ७२ मिलिमीटर, राहाता ७१ मिलिमीटर, नगर ७६ मिलिमीटर, शेवगाव ८० मिलिमीटर, पाथर्डी ४१ मिलिमीटर, पारनेर १२३ मिलीमीटर, कर्जत १०१ मिलिमीटर, श्रीगोंदा ६४ मिलिमीटर व जामखेड तालुक्यात ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.]
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews