ब्रेकिंग

Ahmednagar Breaking: अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर ! ह्या गावात होणारं निवडणुका…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदांच्या निवडीचे आदेश कार्यक्रम निश्चीत केले आहेत. राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली आहेत.

संबंधीत तहसीलदार यांनी आदेश जारी करण्यात आल्यापासून पंधरा दिवसात निवड प्रकिया पूर्ण करण्याचे निर्देश आदेशात दिले गेले आहेत. जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतीचे सरपंच व दोन ग्रामपंचायत उपसरंपच आशा ११ ग्रामपंचायतीची पदाधिकारी निवड या प्रक्रियेनुसार होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थात गावपातळीवरील ग्रामपंचायत या संस्थेस मोठे महत्व आहे.. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतींमार्फत केली जाते. तसेच गावपातळीवर मूलभूत सुविधा याच संस्थेद्वारे पुरवल्या जातात.

गावगाड्याचा कारभार संचालीत करण्याचे काम ग्रामपंचायत पदाधिकारी करीत असतात. त्यामुळेच ग्रामपंचायत पंचवार्षीक निवडणूकीस महत्वाचे स्थान असते. पंचवार्षीक निवडणूकीत स्थानीक पातळीवरील समीकरणाचे धोरण आकाराला येते.

समाधानाचा .. पर्याय म्हणून अलीकडच्या काळात सरपंच आणि उपसरपंचपदाची संधी मिळावी म्हणून सरपंच-उपसरपंच पदाचा कालावधी निश्चीत केला जातो. आपसातील तडजोडीनुसार सर्वसंमतीने निश्चीत केलेला अवधी संपल्यावर हे पदाधिकारी राजीनामा देतात.

त्याच धर्तीवर जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी व दोन उपसरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या रिक्त पदांच्या निवडीची प्रक्रिया जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना आदेशीत करीत जारी केली आहे. येत्या दि. १७ जुलै रोजी किंवा हे आदेश प्राप्त झाल्यापासून १५ दिवसाच्या आत संबंधीत सरपंच व उपसरपंच पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. असे नमूद करण्यात आले आहे.

या आहेत ग्रामपंचायती

देहरे, टाकळी काझी (नगर), पळवे बुद्रुक, हिवरे कोरडा (पारनेर), सुगाव खुर्द (अकोले), धानोरा (जामखेड), हिंगणी दुमाला (श्रीगोंदे), रवळगाव (कर्जत), लखमापुरी (शेवगाव) या ९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पद निवडीसाठी आणि सावरकुटे, तेरूंगण (अकोले) या दोन ग्रामपंचायत उपसरपंचपद निवडीसाठी विशेष सभा होणार आहे.

Ahmednagarlive24 Office