ब्रेकिंग

अहमदनगर जिल्हा हादरला ! जिल्ह्यातील या माजी महिला नगराध्यक्षा यांची घरात आत्महत्या!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे (वय वर्ष ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(ahmednagar breaking)

राहत्या घरामध्ये गळ्याभोवती साडी गुंडाळलेला वर फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

किरण दगडू ताडे (वय वर्ष ४३) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला या घटनेबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या.

अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या. सदरील घटना धनश्री अपार्टमेंट श्रीगोंदा येथे त्यांच्या राहत्या घरात घडली आहे.

पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी या घटनेनंतर अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Ahmednagarlive24 Office