अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूची बाधा झालेला दुसरा रुग्ण बूथ हॉस्पिटल येथून बरा होऊन आज त्याच्या घरी रवाना झाला.
यावेळी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याला रवाना केले.
कोरोना विषाणूची बाधा झालेला दुसरा रुग्ण बरा झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या यशाचे कौतुक केले आहे.
कोरोनामुक्त झालेल्या हा रुग्ण रवाना होताना महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, बूथ हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
नगर शहरात सध्या कोरोनाबाधित १७ रुग्ण असून त्यापैकी २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यात ४९४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सुमारे १ लाख १० हजार जणांना १४ दिवस घरामध्ये बसण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com