ब्रेकिंग

Ahmednagar News : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह आरोपी पोहोचले येरवड्यात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar News :- अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्यांचा सोमवारी (ता.१७) मृत्यू झाला. या हल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे

दरम्यान आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठ आरोपींना न्यायालयाने मंगळवारी (दि. २७) न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान ह्या आरोपींना नगरमध्ये ठेवल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्‍यता पोलिसांनी सांगितल्याने सर्व आरोपींची रवानगी येरवडा येथील कारागृहात करण्यात आली आहे.

गुन्ह्याचा तपास करायचा असल्याने तीन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

येरवडा येथील कारागृहात

कारागृह प्रशासनाने आरोपींना येथील सबजेल कारागृहात ठेवल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाचे पत्र सादर केले होते. त्याची दखल घेऊन न्यायालयाने आरोपींना येरवडा येथील कारागृहात ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आणखी एक आरोपी निष्पन्न

अंकुश त्तर खून प्रकरणात आणखी एका आरोपीचे नाव निष्पन झाले आहे. पवन जगधने असे या आरोपीचे नाव आहे.

स्वप्नील शिंदे कोण आहे ?

स्वप्नील शिंदे हा प्रभाग चार मधील भाजपचा नगरसेवक आहे. त्याच्यावर यापूर्वीही तक्रारी दाखल आहेत. देवाज् ग्रुपच्या माध्यमातून युवकांचे संघटन करून तो परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. महानगरपालिकेत भाजपचा गटनेता म्हणूनही त्याने काम पाहिले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24