अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राजवर्धन यूथ फाउंडेशनच्या वतीने सहाव्या वर्षी होत असलेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद््घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी झाले.
क्रिकेटमुळे चांगले आरोग्य, सांघिक भावना व एकात्मता वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी थोरातांनी क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला.
समनापूर येथील कोल्हेवाडीफाटा येथे स्पर्धेला प्रारंभ झाला. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. हर्षल तांबे, सुरेश थोरात, निखील पापडेजा, आर. कातोरे, के. के. थोरात, भाऊ पाराशूर, गौरव डोंगरे, रमेश नेहे, सिध्दार्थ थोरात,
प्रशांत अभंग, पांडुरंग खेमनर, सनी अभंग, रियाज शेख, सोहेल पिंजारी, साईल शेख, संतोष शरमाळे, अमोर क्षीरसागर, अर्फान सय्यद, सौरभ कडलग, संकेत घुगरकर, अली तांबोळी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ग्रामीण भागात सलग ६ वर्षे ही स्पर्धा सुरु असल्याने अनेकांना संधी मिळाली आहे. संगमनेर येथे युवकांसाठी विविध उपक्रम सुरु करुन त्यांना मोठे व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे.
खेळामध्ये हार-जीत होते. त्यातून खिलाडू वृत्ती जपली पाहिजे. खेळातून प्रोत्साहन मिळत असल्याने नामांकित खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी तालुक्याला लाभली. अजिंक्य रहाणे संगमनेरचा आहे. खेळामधून मन एकत्र होत असून एकात्मता वाढीस लागते.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com