अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : अहमदनगर शहरात शिवभोजन केंद्रासाठी थेट अन्न-औषध प्रशासनाचा बोगस परवाना देऊन परवानगी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी दोन शिवभोजन केंद्र चालकांसह त्यांना अन्न व औषध प्रशासनाचा बोगस परवाना देणारी व्यक्ती, अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद बाळासाहेब मरकड , स्वप्नील जयसिंग निंबाळकर व गायत्री रमेश धायतडकअशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अन्न व औषध प्रशासन कार्यालय येथील सहाय्यक आयुक्त संजय पांडुरंग शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
रेव्हेन्यू कॅन्टीन येथील शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या गायत्री रमेश धायतडक व चौपाटी कारंजा येथील बळीराजा भोजनालयात शिवभोजन केंद्र चालवणारे
शरद बाळासाहेब मरकड यांनी शिवभोजन थाळी केंद्राचा बेकायदेशीर परवाना मिळवण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण मल्टिसर्व्हिसेसचे स्वप्निल जयसिंग निंबाळकर
यांच्याकडून बनावट अन्न व्यवसाय परवाना तयार करून घेतला व शासनाची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews