अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ३२ वर्षीय पुरुष व १८ वर्षीय तरुणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना अकोले तालुक्यातील साकीरवाडी येथे घडली आहे. यातील मुलगी ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे शिक्षण घेत होती, तर तिचा प्रियकर हा विवाहित असून तो मंडप व्यवसाय करीत होता.
साकीरवाडी येथील पांढरीच्या शेतात रोगार व निऑन हे विषारी औषध सेवन करून अशोक मारुती भांगरे व युवती (दोन्ही रा. साकीरवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे मयत दोघांची नावे आहेत.
पोलीस पाटील गोपीनाथ दगडू जगताप यांनी राजूर पोलिसांना खबर दिली. यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतले आहे. सहाय्यक निरीक्षक एन. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास होत आहे.
साकीरवाडी येथील अशोक मारूती भांगरे ( वय ३२) व भाग्यश्री द्रोणाचार्य भांगरे ( वय १८) यांनी गावातील मारूती विठोबा भांगरे यांच्या शेतात विषारी औषध प्राषन करुन आत्महत्या केली.
यातील तरुणी ही करमळा (जि.सोलापूर) येथे चुलत्याकडे शिवण क्लासचे शिक्षण घेत होती. तर या दोघांचे प्रेम संबध होते. अशोकचे लग्न झालेले असुन त्याला पत्नी व तिन मुले आहेत. प्रेम प्रकरण उघडकीस येण्याच्या भितीने त्या दोघांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com