ब्रेकिंग

Ahmednagar Politics : राधाकृष्ण विखेंना जोरदार झटका ! आधी कारखान्यात पाडले आता ग्रामपंचायतीत धोबीपछाड, कोल्हेंकडून एकापाठोपाठ एक धक्के

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Politics : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उत्तरेतील राजकारण हे एक समीकरणच आहे. राजकारण, निवडणूक कोणत्याही असो त्यांचं वर्चस्व ठरलेलं. परंतु अलीकडील काही काळात, बदलत्या सत्ता समीकरणात त्यांना चांगलेच एकामागून एक धक्के बसत आहेत.

विशेष म्हणजे भाजपचेच माजी आमदार असणाऱ्या कोल्हे घराण्याकडून हे धक्के बसत आहेत. आधी गणेश कारखान्यात विवेक कोल्हे यांनी थोरातांशी संगनमत करून विखेंना पाडले व सत्ता काबीज केली. आता विवेक कोल्हे यांनी आज लागलेल्या ग्रामपंचायत निकालात विखेंना धक्का दिलाय. त्यांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात घुसत तीन ग्रामपंचायती खेचून आणल्या.

३ ग्रामपंचायतीत विखे पाटलांची सत्ता संपुष्टात

राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक झाल्या. यामध्ये ९ ग्रामपंचायतवर भाजप विखे गटाने सत्ता मिळवली. तर ३ ग्रामपंचायतीत विखे पाटलांची सत्ता संपुष्टात आणत कोल्हे गटाने विजय मिळवला. पुणतांबा, वाकडी आणि चितळी या तीन ग्रामपंचायतीत त्यांनी आपला विजय ध्वज फडकवला.

कारखान्यानंतर ग्रामपंचायत लक्ष

गणेश सहकारी साखर कारखान्यात विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांचा पराभव केल्याची घटना ताजीच आहे. या निवडणुकीत आ. बाळासाहेब थोरात याना सोबत घेत त्यांनी सत्ता मिळवली. त्यानंतर आता तीन ग्रामपंचायतीत देखील चुरस निर्मण करत व विजय मिळवत कोल्हेंनी विखेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावला.

दिग्गजांना धक्का

या विजयानंतर विवेक कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पुणतांब्यात विवेक कोल्हे आणि धनंजय जाधव यांचे विकास पॅनल होते व याला जनतेने कौल देत विजयी केले. विशेष म्हणजे या पॅनलने अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांचे लोकसेवा आणि विखे पाटलांच्या जनसेवा पॅनलला अर्थात दिग्गजांना धक्का देत पराभूत केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24