ब्रेकिंग

Ahmednagar Politics : मला सुजय विखेंची उमेदवारी मान्य, विखे यांचा सत्कार करत आ.राम शिंदे यांचे मोठे वक्तव्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Politics News : आज आपल्याला विजयाचा संकल्प करायचा आहे. खासदारकीच्या काळात सुजय विखे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आता सर्वानीच एकत्रित येत निवडणूक कार्यालय सुरू केले पाहिजे.

तेथूनच सर्व नियोजन करत विजयाच्या अनुशंघाने तयारी करावी असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस विजय चौधरी यांनी केले. भाजपची लोकसभा निवडणुकीची पूर्वआढावा बैठक आज (दि.१८ मार्च) माउली सभागृहात पार पडली. यावेळी चौधरी बोलत होते.

यावेळी खा. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डीले आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बोलताना विखे पाटील म्हणाले, आपणा सर्वांच्या साथीने, सगळ्यांच्या प्रयत्नातून सर्वांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा काम करायची संधी पक्षाने मला दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे.

माझा पाच वर्षाचा प्रवास फार घट्ट राहिलेला आहे. अनेक लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत पालकमंत्री यांच्या माध्यमातून अनेक महत्वाची कामे केली. प्रामाणिक पणे पक्षाचे व जनतेची विकासात्मक कामे केली असे विखे म्हणाले.

यावेळी आमदार राम शिंदे म्हणाले की,भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. 30 दिवसानंतर फॉर्म भरायचा आहे. विखे यांना दिलेली उमेदवारी मी स्वीकार करतो व येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विजयाची ग्वाही देतो असे आ. शिंदे म्हणाले.

यावेळी आ. मोनिका राजळे, माजी आ. शिवाजी कर्डीले, विक्रम पाचपुते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभय आगरकर, विश्वनाथ कोरडे आदींचे भाषणे झाली.

अहमदनगर लाईव्ह 24