अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या थोडक्यात : 1 नोव्हेंबर 2019
- अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणीस सुरुवात; पंचनामे करण्याच्या सूचना.
- जिल्ह्यातील 11 प्रकल्पांमध्ये मिळून सध्याच्या स्थितीमध्ये 49 हजार 930 दशलक्ष घनफूट म्हणजेच जवळपास 50 टीएमसी पाणीसाठा.
- विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या दारुण पराभवानंतर आता विखे पितापुत्रांविरोधात भारतीय जनता पक्षातच नाराजी, भाजपच्या नगर शहर जिल्हा उपाध्यक्षांनी विखे पिता-पुत्रांचा नामोल्लेख टाळून टीका करत नैतिक जबाबदारी स्वीकारुन खासदारकी व आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
- निवडणुकीत एकमेकांच्या गळ्यात हात टाकून चालणाऱ्या भाजप-शिवसेनेतील पदासाठीचा वाद स्वार्थी हेतूने; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीका.
- पैशाच्या वादातून जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बाळू बजरंग पवारची निर्घृण हत्या, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.