राखी बांधून घेतांना कैदी बांधवांचे डोळे पाणावले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अ.नगर – येथील जिल्हा कारागृह मध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने राखी पौर्णिमेचा सण कैदी बांधवांना राखीबांधून साजरा करण्यात आला व इतर प्रसंगी नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांनी राखीचे महत्व सांगून नेत्रदाना विषयी माहितीसांगितली. सदर  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेलर एन जी सावंत हे होते, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष महावीर मेहेर यांनी दिली.

कारागृहाच्यावतीने  श्यामकांत शेंडगे यांनी स्वागत केले. सुधार व पुर्नवसन या हेतुने कैदी बांधवाना येथे योग्य ते मार्गदर्शनकेले जाते. आजचा हा कार्यक्रम  त्याचाच एक भाग आहे असे ते म्हणाले.

रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया, सौ पल्लवी मेहेर, सौ छाया करंजुले, सौ सुनिता कर्नावट यांनी कैदी बांधवांनातिलक, औक्षण करून राखी बांधली त्यावेळेस घरापासून दूर असणार्या कैदी बांधवांच्या डोळयात पाणी आले. त्यांच्या भावना अनावरझाल्या सदर प्रसंगी रोटरीच्या वतीने पुस्तकांचा सेट कारागृहातील लायब्ररीसाठी भेट देण्यात आला.

 श्री एन जी सावंत, श्री श्यामकांत शेंडगे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ अ.नगर व साई सूर्य नेत्रसेवा यांनी तयार केलेली‘नेत्रदानश्रेष्ठदान’ या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी रोटरीचे माजी अध्यक्ष  कौशिक कोठारी,  दिलीप कर्नावट हेउपस्थित होते. 

सदर माहिती पत्रिका वाचून कैदी बांधवानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व त्यांनी नेत्रदानाचा संकल्प करण्याविषयीउत्सुकता दाखविली. नेत्रदानाचे फॉर्म आवर्जुन मागुन घेतले. कैदी बांधवांसाठी नेत्रदानाविषयीचा असा उपक्रम घेणारे रोटरी क्लब वसाई सूर्य नेत्रेसेवा हे देशातील पहिले संघटन होय असे प्रतिपादन रोटरीचे सचिव दादासाहेब करंजुले यांनी केले.  

अध्यक्षीय भाषणात जेलर सावंत म्हणाले की राखीचा धागा छोटा असतो पण तो थेट हृदयापर्यंत पोहचतो. हृदय परिवर्तनही करूशकतो त्याचीच प्रचिती आज आली आहे. कैदी बांधवांनी मरणोत्तर नेत्रदानाविषयी दाखविलेली उत्सुकता हे माणुसकीचे लक्षण आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24