अहमदनगरकरानों पाणी जपून वापरा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  अहमदनगर शहरास काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. यामुळे नगर शहरातील पाणीपुरवठा योजनेला या पावसाचा फटका बसला आहे.  शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस विस्कळीत होणार आहे.

जलवाहिनी फुटली 
वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर पाण्याचा आणि हवेचा दाब कमी जास्त होऊल रात्री साडेबाराच्या सुमारास मुख्य जलवाहिनी फुटली, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

कमी दाबाने पाणी 
दरम्यान दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे असून रात्रभर तंत्रज्ञ जलवाहिनी दुरूस्तीच्या कामात होते. रविवारी पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागात आज पाणी मिळणार नाही. शहराच्या उपनगरांना आज उशिरा आणि कमी दाबाने पाणी मिळेल.

सोमवारी येथे पाणी सुटणार 
सिद्धार्थ नगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, सर्जेपुरा, नालेगांव, कापड बाजार, आनंदी बाजार, नवीपेठ, माणिक चौक, सावेडी गावठाण व बालिकाश्रम रोड.

मंगळवारी येथे पाणी सुटणार 
झेंडीगेट, सर्जेपुरा, मंगलगेट, कचेरी परिसर, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा, कोठी या भागाला पाणी मिळणार.

आवाहन 
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24