अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेब यांनी कोरोना संकटकाळात उत्तम कामगिरी केलेली आहे. ते दिवसरात्र अहमदनगरच्या जनतेसोबत होते. शहरातील नागरिकांना त्यांनी मोठा दिलासा दिलेला आहे. त्यांना टार्गेट करून इतके दिवस बेपत्ता असलेले राजकारणी एकत्र येत जर नावे ठेवत असतील तर ते अहमदनगरची जनता खपवुन घेणार नाही.
जिल्हाधिका-यांना नाव ठेवणारे पुढारी कोरोना संकटकाळात जनतेसोबत न रहाता कुठे गायब होते? अहमदनगरची महानगरपालिका राष्ट्रवादी आणि आरएसएस-बीजेपीच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. महानगरपालिका शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास सपशेल अपयशी ठरलेली आहे.
कोरोना वैद्यकिय सेवा मनपाने न चालवता खाजगी चालविली जात असल्याच्या बातम्या येत आहेत. मनपाकडून आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती या कामांचा बोजवारा उडालेला आहे. कोरोना संकट काळातही नागरिकांचे आरोग्यासह इतर प्रश्न सोडविण्याऐवजी कचरा घोटाळा, BS4 वाहने घोटाळा, ओढे नाले बुजविण्याचा घोटाळा या सारखे पैसेखाऊ कार्यक्रम मनपात सुरू होते.
मनपातील अधिका-यांवर नैतिक नियंत्रण नसल्याने काही अधिकारी गुन्हे दाखल होऊन काही दिवस फरार होते. खुद्द मनपातील कर्मचारी व अधिकारी दुर्लक्षामुळे कोरोना संसर्गग्रस्त झालेले असुन या अपयशाचे खापर माननिय जिल्हाधिकारी यांच्यावर फोडणे निषेधार्ह आहे. अहमदनगरची जनता कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासोबत आहे.
बळजबरीने लॉकडाऊन करण्यापुर्वी या पुढा-यांनी केंद्र व राज्य सरकारकडे शेतकरी, कामगार, छोटे हातगाडीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेते, छोटे व्यापारी, खाजगी नोकरदार व सामान्य माणसांची रोजगाराची, वेतनाची व उदरनिर्वाहाची सोय लावावी. लॉकडाऊन भागातील प्रत्येक नागरिकाला मार्च महिन्यापासुन १० हजार रूपये मासिक उदरनिर्वाह भत्ता त्वरीत मिळवुन द्यावा.
सामान्य माणसाला लॉकडाऊनच्या संकटात टाकुन मोठ्या भांडवलदारांचे घर भरण्यासाठी लॉकडाऊनचा आग्रह केला जातोय का हे नागरिकांनी पाहणे गरजेचे आहे. आपले अपयश झाकण्यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांना टार्गेट करण्याऐवजी पुढा-यांनी केंद्र व राज्य शासनाकडे कोरोना आपत्ती रोखण्यासाठी स्पेशल अधिकारी यांची नियुक्ती करून घ्यावी.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews