अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९१.९७ टक्के लागला.
यंदाही मुलींचे गुणवत्तेचे प्रमाण जास्त आहे. नगर जिल्ह्यात मुली उत्तीर्णचे प्रमाण ९६.१२, तर मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण ८८.९३ टक्के आहे. पुणे विभागात मात्र नगर जिल्हा तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
जिल्ह्यातून ६५ हजार ५१३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ५८ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के
तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे. पुणे विभागाचा ९२. ५० टक्के निकाल लागला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews