जिल्हा न्यायालयात तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या वकिलास दंड.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- न्यायालयात थुंकणाऱ्या एका वकिलासह चौघांविरुद्ध बुधवारी कारवाई करण्यात आली. प्रत्येकाकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आवारात तंबाखू, पान, मावा, गुटखा खाऊन थुंकून भिंती खराब करण्यात आल्या आहेत.

न्यायालयातील भिंतीवर थुंकू नये, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. त्यानंतरही वकील, पक्षकार व इतर जण तंबाखू खाऊन थुंकून भिंती खराब करत आहेत.

बुधवारी न्यायालयात थुंकणाऱ्या चार जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

वकील भागचंद काळे बुधवारी दुपारी न्यायालयात आले होते. त्यांना न्यायालयाच्या भिंतीवर थुंकताना पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांच्याकडून बाराशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24