अहमदनगर लाईव्ह24 टीम :- गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अखीलेश कुमार सिंह यांची आज नेमणूक करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे माजी पोलिस अधीक्षक इशू सिंधू हे लंडनला दोन वर्षांच्या शिक्षणासाठी गेल्याने नगरचे पोलिस अधीक्षकपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते.
बुधवारी रात्री उशिरा याबाबत गृह विभागाने आदेश काढले. सिंह हे मुंबई शहराच्या पोलीस उपआयुक्त (परिमंडळ- 7) पदावर कार्यरत होते. आता ते नगरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहे.
सिंधू गेल्यानंतर जिल्हात खून, दरोडा, गोळीबार, चोऱ्या, घरफोड्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अनेक संघटना कडून पोलीस अधीक्षक लवकर मिळावे म्हणून सातत्याने मागणी होत होती.
सध्या कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश कुमार सिंह हे पोलीस अधीक्षक म्हणून मिळाल्याने त्यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com