अकोले : अकोले तालुक्यातील कळस गाव व परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळूउपसा व वाहतुकीस बंदी असताना विनापरवाना वाहतूक पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलिसांनी आपला मोर्चा वाळूतस्करांकडे वळवला आहे.
मंगळवारी पहाटे कळस शिवारातील प्रवरा नदीच्या पुलावर टाटा सुमोमधून भाऊसाहेब रामनाथ साळवे हा विनापरवाना वाळूची वाहतूक करताना आढळला.
या संंदर्भात कॉन्स्टेबल चंद्रकांत विठ्ठल सदाकाळ यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून ३ हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू व एक लाख रुपये किमतीचे टाटा सुमो टेम्पो वाहन असा एकुुण १ लाख ३ हजारांचा माल जप्त करून आरोपीला अटक केेेेली.