अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-गेली अनेक महिने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होता, या संकटाला सामोरे जात त्याच्यावर विजय मिळवत असताना नगरकरांच्या समोर आणखी एक मोठे संकट येऊन उभे राहिले आहे.
देशात बर्ड फ्ल्यू या आजराने प्रवेश केला आहे, यामुळे अनेक पक्षयांच्या मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या धोक्याची घंटा आता नगर जिल्ह्यात देखील वाजू लागली आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरणे समोर आली आहे, यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात गेल्या काही दिवसांत 315 पक्षांचा मृत्यू झाल्याचे समाोर आले आहे.
या मृत पक्षांमध्ये कोंबड्या, कावळे, कबूतर, मैना, सांळुकी यांचा समावेश असून यात श्रीगोंद्याच्या कावळ्याचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून उर्वरित अहवालाची पशू विभागाला प्रतिक्षा आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी भात 63 कोंबड्या मरण पावल्या होत्या. मात्र, त्यांचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
त्यानंतर श्रीगोंदा शहरात एक कबूतर, तालुक्यातील भानगावमध्ये एक कावळा, जामखेड तालुक्यातील मोहामध्ये एक कावळा, नगर तालुक्यातील बाराबाभळीमध्ये एक सांळुकी, अकोले तालुक्यातील धामणगाव पाठ येथे बुलबुल, नगर तालुक्यातील भोईरे पठारे येथे कावळा मृत झालेले आहेत.
यात श्रीगोंदा भानगावचा कावळ्याचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासह नगर तालुक्यातील आठवड या ठिकाणी 125 कोेंबड्या, निंबळक या ठिकाणी 75 कोंबड्या, चिचोंडी पाटील या ठिकाणी 18 कोेंबड्या मृत पावलेल्या आहेत. यातील पाथर्डी वगळता अन्य तपासणी अहवाल पेंडींग आहेत.
मंगळवारी पुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे एक कावळा, श्रीगोंदा शहरात मैना, संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे एक कावळा, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे 10 कोंबड्या आणि चिंचोंडीत 15 कोंबड्या मृत पावलेल्या आहेत. यातील एका श्रीगोंद्यातील एका कावळ्या अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून उर्वरित अहवालाची प्रतिक्षा आहे.