शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा: आमदार जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संत गाडगेबाबा यांनी अनेक वर्षांपूर्वी स्वच्छतेचे महत्त्व देशाला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले आहे. गावोगावी स्वच्छतेतून आरोग्याचे महत्त्व समाजाला कळावे, यासाठी ते अनेक ठिकाणी जाऊन सांगत असत. दगडात नव्हे तर माणसांत देव पाहण्याचे त्यांनी शिकवले.

गाडगेबाबांचे विचाराने स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी हागणदारीमुक्ती योजनेतून गावांना दिशा दिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छ अभियानातून स्वच्छतेचे महत्त्व देशाला दाखवले आहे.

स्वच्छतेमुळे माणसाचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यास मदत होते, यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, नगर शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी विविध संस्थांनी पुढे येऊन स्वच्छतेचा संकल्प करावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

संत निरंकारी सेवा दलाच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले, त्यावेळी जगताप बोलत होते. यावेळी हरिश खूपचंदानी, आनंद कृष्णानी, नगरसेवक अविनाश घुले, संभाजी पवार, अभिजित खोसे व सेवादलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24