अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना तपासण्यांचा वेग वाढू लागला आहे तसतश्या कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे.
बहुतांश जणांना कोरोनाची लक्षणे आहे मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र अशाच एका व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरी कोरोनाच्या लक्षणाने त्याने जीव गमावला.
पारनेर तालुक्यातील दामू मारूती शेळके (वय ५५) यांना काही दिवसांपूर्वी सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे चार पाच दिवस खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
तरीही त्यांना फरक पडला नाही. नंतर त्यांना श्वसनाचा त्रास होउ लागल्याने दामू शेळके यांना पारनेरच्या ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची कोरोनाची रॅपीड टेस्ट करण्यात आली.
तीचा अहवाल निगेटिव्ह आला. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना दुस-या दिवशी सकाळी नगरच्या शासकिय रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले. दरम्यान, मयत दामू शेळके हे पारनेर कारखान्याचे कर्मचारी होते. कारखाना प्रशासनाने त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved