अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : जमिनीच्या वादातून तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा तर त्याच्या आई वडीलांना दंडक्याने व लाथा बुक्क्यांने मारहाण केली. ही घटना संगमनेर तालुक्यात घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,जमिनीच्या वादातून शांताराम यशवंत घोगरे, शिवाजी उर्फ शिवनाथ लहानू फटांगरे, सविता शांताराम घोगरे, चैतन्य शांताराम घोगरे,
धिरज शांताराम घोगरे (सर्व रा. तळवाडी, पोखरी बाळेश्वेर ता. संगमनेर.) यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या डोक्यात कुऱ्हाडीने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यात फिर्यादी व त्याचे आई वडील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews