अहमदनगर : एका ६० वर्षीय वृद्ध महिलेस हाताच्या चापटीने मारहाण करुन तिच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले बळजबरीने चोरुन नेले.
ही घटना नगर तालुक्यातील बाराबाभळी परिसरातील मोरे वस्ती, कवड्याची खोरी येथे मंगळवार दि.२६ रोजी ७ वाजता घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेबीबाई भानुदास कवडे (वय ६०, रा. मोरेवस्ती, कवड्याची खोरी, बाराबाभळी) ही वृद्ध महिला घरासमोर भांडे घासत होती.
यावेळी तेथे नंदू रामदास पवार (वय १९, रा. परभणे वस्ती, कापूरवाडी), विठ्ठल उर्फ बंडू उर्फ लंगड्या निकम (रा.उक्कडगाव, ता.नगर) हे दोघे तेथे आले.
त्यांनी बेबीबाई हिच्या गळ्यातील सोन्याचे डोरले तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र बेबीबाई हिने प्रतिकार केला असता, या दोघांनी तिच्या तोंडात चापटी मारल्या. बेबीबाई धक्का लागून खाली पडल्याने तिचा एक दात पडला तर काही दात हलू लागले.
या संधीचा फायदा घेऊन दोघांनी तिच्या गळ्यातील तिन ते साडेतिन ग्रॅम वजनाचे डोरले हिसकावून चोरुन नेले. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी बेबीबाई कवडे यांच्या फिर्यादीवरुन जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून, याबाबत अधिक तपास पोसई शिंदे हे करीत आहेत.