अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : मार्च पासून कालपर्यंत शहरासह जिल्ह्यात ६१८ कोरोना बाधित आढळून आले आहेत. यापैकी काल रविवार पर्यंत तब्बल ४०० जण कोरोनावर मात करीत घरी परतले आहेत.
काल आणखी १५ जण कोरोनामुक्त झाले. यात नगर महापालिका क्षेत्रातील ९, नगर तालुका ४ आणि संगमनेर व पारनेर मधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या ४०० झाली आहे.
मार्च महिन्याच्या १२ तारखेस जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. तेंव्हा पासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधाची लढाई निरंतर सुरु आहे.
यात महसूल, पोलीस यंत्रणेसहित आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे परिश्रम महत्वाचे आहेत. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या दिलासादायक आहे.
प्रशासनाच्या सूचना आणि आरोग्य यंत्रणेच्या उपचारास योग्य तो प्रतिसाद देत तब्बल ४०० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनावर मात करता येते हे चिमुकल्यासह अनेक वयोवृध्दांनी दाखवून दिले आहे. नागरिकांनी परिस्थिती गांभीर्य लक्षात घेऊन दक्षता घ्यावी, असे आवाहन नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews