आणि बाळ बोठेचे वकीलच कोर्टात आले नाहीत….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे विरोधात पोलिसांनी कोर्टाकडून मिळविलेले स्टॅडिंग वॉरंट रद्द करावे या मागणीसाठी कोर्टात केलेल्या अपीलावर आज मंगळवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे.

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात फरार असलेला आरोपी पत्रकार बाळ बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात स्टॅडिंग वॉरंट जारी केले आहे.

पारनेरच्या कोर्टाने स्टॅडिंग वॉरंटला परवानगी दिली आहे. पारनेर कोर्टाच्या निर्णयाविरोधात बोठेने सेशन कोर्टात अपील केले आहे. आज मंगळवारी त्यावर सुनावणी होती, पण बोठेचे वकिलच कोर्टात आले नाहीत ते आज उपस्थित नव्हते.

त्यामुळे कोर्टाने सुनावणीसाठी 18 तारीख ठेवली आहे. दरम्यान सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अनिल ढगे हे बाजू मांडणार आहेत. ते आजच्या सुनावणीला उपस्थित होते. पण आज सुनावणी न झाल्याने त्यांचा युक्तीवाद झाला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या जरे यांचा ३० नोव्हेंबरला सायंकाळी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून खून झाला होता. सुरवातीला हे प्रकरण गाडीला कट मारल्याच्या कारणातून झाल्याचे पुढे आले होते.

मात्र, त्यानंतर हा कट रचून, सुपारी देऊन करण्यात आलेला खून असल्याचे तपासात उघड झाले. पत्रकार बोठे याचे मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आले. त्याच्याविरूद्ध पोलिसांना पुरावेही मिळाले.

मात्र, अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली. त्याच्याविरूद्ध स्थायी वॉरंटचा आदेशही पोलिसांनी मिळाली.

मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. तरीही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24