अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथील गावात एकाचा खून करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे खून केल्यानंतर आरोपी स्वता पोलीस ठाण्यात हजर झाला.पोलीस ठाण्यात धावत येवून सदर आरोपी पोलिसांना म्हणाला साहेब, चला मी एकाचा कुऱ्हाडीने खून केला आहे..चला तो स्पॉट दाखवितो.
पोलीस त्याच्या बरोबर गेले तेव्हा तो खरे बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे, निर्घृणपणे एक जण उसाच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून इसमाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंप्री येथे घडली आहे.
म्हातार पिंप्री येथे अनैतिक संबंधाच्या रागातून ४५ वर्ष वयाच्या नरेंद्र सयाजी वाबळे याची आरोपी राजेंद्र बबन शिरवळे याने सोमवार दि.२० रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली.
नरेंद्र वाबळे याचे राजेंद्र शिरवळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा शिरवळे याला संशय येऊन याच संशयातून ही हत्या झाली असल्याचे समजते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com