अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनापासून दिल्लीतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी धुमश्चक्री झाल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही केला आहे.
दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.
अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल माध्यमांमध्ये शंका उपस्थित केल्या जात आहेत. भाजप नेत्यांच्या शिष्टाईनंतर हजारे यांनी उपोषण मागे घेतल्याने आपल्या विश्वासार्हतेवर परिणाम होईल असे आपल्याला वाटत नाही का असे विचारले असता
हजारे यांनी माझ्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला तरी मला फरक पडत नाही असे म्हटले आहे. कोणी कोणत्या चष्म्यातून पाहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
एखाद्याचा पाहण्याचा चष्माच वाईट असेल तर त्याला आपण काय करणार असे मत हजारे यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांवर आपल्याला पुर्ण विश्वास असून त्यामुळे आपण उपोषण मागे घेत आहोत असं हजारे यांनी सांगितले आहे.