अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- पाइपलाइन रस्त्यावरील श्रमिकनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर १ ऑगस्टपर्यंत कंटेन्मेंट झोन घोषित केला.
शहरातील फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शहरातील विविध भागात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात येत आहेत.
पाइपलाइन रोडकडून श्रमिकनगरकडे येणारा मुख्य रस्ता, वाॅशिंग सेंटर, सागर मेहसुने यांचे घर, कोडम यांचे घर, शेजवळ यांचे घर ते पाइपलाइन रोड श्रमिकनगरकडे येणाऱ्या रस्त्यापर्यंतचा भाग कंटेन्मेंट घोषित केला.
बफर झोनमध्ये रेणावीकर कॉलनी, प्रतिमा कॉलनी, जय बजरंग विद्यालय, श्रेयस कॉलनी परिसराचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.comupda