प्रजासत्ताक राष्ट्राने प्रगती केली; मात्र आज संविधानाला काँग्रेस विरोधी लोक धक्का देत आहे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  26 जानेवारी 1960 रोजी प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे राज्य स्वतंत्र भारतात सुरु झाले. संविधान या दिनापासून लागू झाले. जगातील सर्वात मोठे हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. गत 70 वर्षातील बदल पहात देशाने विविध क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे, त्यात काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे. मात्र आज काँग्रेस विरोधी लोक संविधानाला धक्का पोहचवत आहे, अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी केले.

अहमदनगर शहर काँग्रेस आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री.देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, नागरिकत्व कायदा प्रश्‍नांमुळे देशात अशांतता निर्माण झाली आहे, पण जनता जनार्धन पुन्हा काँग्रेसला बळकटी देऊन सत्तेवर आणतील तेव्हा देशात एकात्मता, शांतता नांदून विकासाला पुन्हा प्रारंभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खरी भिस्त शहर, तालुका, जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांवर आहे. पक्षाचे राज्य प्रभारी मलिकार्जुन खर्गे यांनीही पक्षातील कार्यकर्ता मजबूत करण्यावर भर देण्याचे सूचविले आहे. कार्यकर्त्यांच्या कामाची दखल श्रेष्ठींना ही घ्यावी लागेल, असा हा काळा समन्वयाचा असून, पक्षासाठी कार्यकर्त्यांनी संघटीतपणे पुन्हा पुढे यावे, असे आवाहन केले.

शहर काँग्रेस आयोजित या ध्वजारोहण कार्यक्रमात भिंगार शहर काँग्रेस, पक्षाचा अल्पसंख्याक विभाग, महिला काँग्रेससह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी स्वागत, प्रास्तविक केले. कार्यक्रमास भिंगार अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष फिरोज शफीखान,

महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सौ.सविता मोरे, मागासवर्गीय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप सकट, प्रदेश सदस्य श्यामराव वाघस्कर, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे, माजी पोलिस उपनिरिक्षक व पक्षाचे सदस्य एम.आय.शेख, आर.आर.पाटील, राजेश बाठिया, अरुण धामणे,

सरचिटणीस मुकुंद लखापती, युवा नेते अजहर शेख, शारदा वाघमारे, मिनाताई घाडगे, जरीना पठाण, उज्वला पारधे, रजनी ताठे, संपूर्णा सावंत, सिंधूताई कटके, संजय झोडगे, कैसर सय्यद, अज्जू शेख, विवेक येवले, निजाम पठाण, सुभाष रणदिवे, संतोष धीवर, अनिल परदेशी, अ‍ॅड.शहाणे, फकीरमदार महमंद, सागर ताठे, महमंद अल्ली शहा, अशोक कुपलानी, रमेश कदम, एम.जी.खान, पालवे, वाहिद शेख, महमंद नुरी, रवी सूर्यवंशी आदि उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24