नामदार तनपुरेंनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल जनतेमधून कौतूक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पाथर्डी तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे विजेचे अनेक खांब पडले, तारा तुटल्याने गावठान तसेच शेतीपंपाचा देखील वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्याची परिस्थिती लक्षात घेता वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. अशा स्पष्ट सूचना या भागाचे लोकप्रतिनिधी तथा उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पाथर्डी तालुक्यातील भोसे सबस्टेशन व मिरी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या बावीस गावांत शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले, तारा तुटल्या त्यामुळे संपुर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. करंजी ,भोसे, खांडगाव, लोहसर ,वैजूबाभळगाव, आठरे कौडगाव, सातवड, दगडवाडी ,जवखेडे, जोडमोहोज, चिचोंडी, कामतशिंगवे, आडगाव , शिराळ, कोल्हार, मिरी या भागातील ही वीज पुरवठा खंडित झाला होता.

वादळामुळे विजेचे खांब पडल्याची व तारा तुटल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, सरपंच अमोल वाघ यांनी ना.तनपुरे यांना दिल्यानंतर ना.तनपुरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष परवानगी घेऊन मालेगाव येथून दोन ट्रक विजेचे खांब मागून घेतले व ज्या भागात विजेचे खांब पडलेले आहेत. त्या भागात तात्काळ विजेचे खांब उभे करण्याची व तारा ओढण्याचे काम सुरू केल्याने काही तासात या संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. ना. तनपुरेंनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल या ३९ गावांतील जनतेमधून त्यांचे कौतूक केले जात आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24