अर्णब गोस्वामी अटक प्रकरण : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची फाईल करून टाकली होती बंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गोस्वामी यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.अलिबाग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गोस्वामींना अटक केली असून त्यांना पुढील चौकशीसाठी अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे.

अलिबाग तालुक्यातील कावीर गावातील अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांनी मे 2018 रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या घेतल्याची घटना घडली होती.

आई आणि मुलाच्या या आत्महत्ये प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. प्रख्यात वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या तपासाची फाईल अलिबाग पोलिसांनी नाईक कुटुंबाला कोणतीही माहिती न देता परस्पर बंद करून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे ही कैफियत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी मांडली होती, सरनाईक यांनी गृहमंत्र्यांना याबाबत पत्र लिहून नाईक कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

या प्रकरणाचा योग्य तपास झाला नसून फेरतपास व्हावा, अशी मागणी अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून केली होती.

त्यानुसार या संपुर्ण प्रकरणाची चौकशी ही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) देवून फेरतपास करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. याच प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी बुधवारी मुंबई येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24