नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी वर्ग

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-यंदा जूनपासून शेवगाव तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कपाशी, तूर, सोयाबीन, कांद्यासह ऊस व फळबागांचे नुकसान झाले.

हातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्याने, केलेला खर्च वाया गेला. सरकारने नुकसानीची दखल घेऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

सरकारकडून नुकसान भरपाईपोटी तालुक्‍याला 48 कोटी 50 लाखांचा निधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यातील पहिल्यात टप्प्यात 24 कोटी 23 लाख रुपये तालुका प्रशासनाला प्राप्त झाले.

त्याचे 53 गावांतील 29 हजार 405 शेतकऱ्यांच्या 22 हजार 800 हेक्‍टर बाधित पिकांसाठी 22 कोटी 71 लाख रुपये बॅंक खात्यांवर वर्ग केले आहेत.

अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

रब्बी पिकाच्या तयारीसाठी मिळालेले हे अनुदान शेतकऱ्यांना उपयोगी पडणार असले, तरी उर्वरित गावांतील शेतकऱ्यांना मात्र दुसऱ्या टप्प्याच्या मदतीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही तालुक्‍याचा दौरा करून पिकांसाठी हेक्‍टरी 10 हजार, तर फळपिकासाठी 25 हजार रुपयांप्रमाणे मदत जाहीर केली.

उर्वरित गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त होताच दुसऱ्या टप्प्यात वितरित केली जाणार असल्याचे तहसीलदार अर्चना भाकड यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24