अहमदनगर : राज्य गुन्हे अन्वेषण विभागांतर्गत कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक गणेश येमुल यांचे गुरुवारी रात्री ह्रदयविकाराने निधन झाले.
नगरचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सुरक्षा टीममध्येे ते प्रतिनियुतीवर होते. त्यांच्या आयटी सेलचे कामही येमुल पहात होते.
सायबर तज्ञ म्हणून येमुल यांचा लौकिक होता. गुरुवारी रात्री पुण्यात त्यांचे निधन झाले. शुक्रवारी नगरमध्ये 10 वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.