ती नवऱ्याला अखेरचं भेटून त्याच्याकडून घटस्फोट मागणार होती. पण तिची भेट झालीच नाही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. 

दोषींमध्ये बिहारमधील रहिवासी अक्षय ठाकूरचा समावेश आहे. अक्षयची पत्नी पुनिता आणि लहान मुलाबरोबर गुरुवारी अखेरची भेट होणार होती.

परंतु उशीरा आल्यामुळे तिहार जेल प्रशासनाने भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. पुनिताने एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे.

इतकंच नाही तर तिला पतीशी शेवटचं काय बोलायचं होतं हे देखील तिने माध्यमांना सांगितलं आहे. ती नवऱ्याला अखेरचं भेटून त्याच्याकडून घटस्फोट मागणार होती.

पण तिची भेट झाली नाही आणि कुटुंबियांना भेटण्याची अक्षयची इच्छा अपूर्ण राहिली. ती नवऱ्याला निर्दोष मानते. आता अक्षयच्या शुक्रवारी अखेरच्या अंत्यसंस्कारानंतरच ती बिहारमध्ये परतणार आहे.

यापूर्वी, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात निर्भया प्रकरणातील दोषींच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्राम सुरू होता.

तेव्हा दोषी अक्षयची पत्नी पुनीता आणि स्वत: च्या लहान मुलालाही फाशी देण्याची मागणी करत होती. तिने स्वत:ला सँडिलने मारहाण केली आणि बेशुद्ध पडली. ती म्हणाली की समाज तिच्या सभ्य पतीच्या मागे लागला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24