श्रीगोंदा :- तालुक्यातील यापूर्वी पाठविलेले सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याने श्रीगोंदेकरांना मोठा दिलासा मिळाला असला तरीही आता नवीन निघालेला आजार म्हणजे सारी चा एक संशयित रुग्ण श्रीगोंद्यात आढळल्याने पुन्हा श्रीगोंदेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यात कोरोना विषाणूशी संबंधित लोकांचे सर्वच्या सर्व अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत. मात्र आता आता नव्याने एक महिला रुग्ण समोर आली असून त्या महिलेला सारी आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच व्यक्तीला कोरोनाचे लक्षणे असल्याने तपासणीसाठी तिला नगरला हलविण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना तहसिलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, सदर महिलेला तातडीने नगरला रवाना केली असून त्या महिलेला सारीचा आजार आहे.
सदर महिला कोरोना संशयित असल्याचे लक्षात आल्याने नगरला जिल्हा रुग्णालय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सध्या तरी ती कोरोना संशयित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याबाबत निश्चित सांगता येईल असेही माळी म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®