जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-अहमदनगर मधील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. मनपा, जिल्हा परिषद, कलेक्टर कार्यालयातील पुरवठा विभाग याठिकाणी रुग्ण आढळले.

नुकतेच जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. आता या ठिकाणी असणार्‍या बड्या साहेबांच्या कार्यालयात कार्यरत शिपायाचे सगळे कुटूंबच कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

विशेष म्हणजे संबंधीत शिपाई याचा सुदैवाने अहवाल निगेटिव्ट आला आहे. परंतु यामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे.

दरम्यान, नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसारात असणार्‍या जिल्हा पुरवठा विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

या ठिकाणी काम करणार्‍या दोन कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 31 जुलैपर्यंत पुरवठा विभागाचे कार्यालयीन कामकाज बंद राहणार आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24