आमिष दाखून महिलेवर अत्याचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : 

एका ३८ वर्षीय महिलेला लोभने, आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्या याप्रकरणी एका जणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सुनील रामभाऊ कानवडे (रा.निमगाव पागा, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जानेवारी २०१८ ते ६ जुन २०२० या कालावधीत पीडित महिलेवर संगमनेर शहरात काही ठिकाणी तसेच अकोले तालुक्‍यातील भंडारदरा येथे लॉजवर नेऊन सुनील कानवडे याने अत्याचार केले.

याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी ( १४ जून) दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेबाल, पोलीस कॉन्स्टेबल सचिन उगले हे तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24