अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार , नग्नावस्थेतील फोटो तिच्या मोबाइलवर पाठवुन …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  एका तरुणीवर लग्नाचे अमिष दाखवुन बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्तापित केले आणि नजर चुकवुन नग्न अवस्थेत फोटो काढले.

हा खळबळजनक प्रकार नगरमध्ये घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादी वरून आरोपी तरुणविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बाबतची सविस्तर माहिती अशी कि फिर्यादी मुलगी (वय-२७ वर्षे, रा.- मु.पो.शेकापुर, ता-आष्टी, जि- बीड,) हल्ली रा.- जाधव मळा,बालीकाश्रम रोड, हिच्याशी आरोपी प्रविण गहिणीनाथ खेडकर (रा-खामगाव, ता- पाथर्डी, जि-अहमनदगर) याने 08 नोव्हेंबर २०२० रोजी रात्री लग्नाचे अमिष दाखवुन फिर्यादी यांचेशी बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्तापित केले.

तसेच फिर्यादी यांची नजर चुकवुन नग्न अवस्थेत फोटो काढले. पीडित मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्न करण्यास नकार दिला. फिर्यादी यांचे नग्नावस्थेतील फोटो तिच्या मोबाइलवर पाठवुन तुझे कुणाशी लग्न होवु देणार नाही अशी धमकी दिली.

फिर्यादीच्या सांगण्यावरुन आरोपी प्रविण गहिणीनाथ खेडकर यांच्या वर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणाचा पुढील तपास विशाल ढुमे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग हे करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24