ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : Whatsapp Admin वर Atrocity गुन्हा ! अटकेसाठी शहर बंद

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : सोशल मीडियावर जातिवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी देवळाली प्रवरा येथील व्हॉटसअॅप ग्रुप अॅडमिन सह अन्य दोघांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातीयवादींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी देवळाली प्रवरा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरपीआयच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा परिसरात सोशल मीडियावर असलेल्या

सकल हिंदू समाज राहुरी फॅक्टरी- देवळाली प्रवरा या व्हॉटसअॅप ग्रुपवर जातिवाचक पोस्ट टाकून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे राहुरी पोलिस ठाण्यात सागर संसारे यांच्या फिर्यादीवरून डॉ. रवींद्र सुदाम भांड, अनिल पटारे, दत्तात्रय गागरे (ग्रुप अँडमिन) या तिघांवर अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेच्या निषेधार्थ देवळाली प्रवरा शहरात आरपीआयच्या वतीने निषेध रॅली काढून देवळाली प्रवरा बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील व्यापारी व दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला. दुपारपर्यंत शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प होते.

आज सकाळी देवळाली प्रवरा बाजारतळ येथे घटनेचा निषेध करून सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट टाकणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, पत्रकार रफिक शेख, कुमार भिंगारे, एकलव्य संघटनेचे गीताराम बर्डे, संतोष सरोदे, शोएब तांबोळी यांनी निषेधपर मनोगत व्यक्त केली.

यावेळी राजू थोरात, माऊली भागवत, संजय संसारे, जनता ग्रुपचे पप्पू बर्डे, सोमनाथ भागवत, मनसेचे अनिल डोळस, विजय सरोदे, शंकर धोत्रे, लालू पंडित, अर्षद शेख आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office